वेल्लोरमध्ये 24 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त
500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. मात्र या नव्या नोटांचा साठा अनेक ठिकाणी आढळत असल्याच्या घटना समोर येतायत.
वेल्लोर : 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. मात्र या नव्या नोटांचा साठा अनेक ठिकाणी आढळत असल्याच्या घटना समोर येतायत.
या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर अनेक ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आलीये. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्येही अशीच घटना घडलीये.
वेल्लोरमध्ये 24 कोटी रुपयांच्या नव्या 2000च्या नोटा जप्त करण्यात आल्यात. प्रत्येक बॉक्समध्ये दोन कोटी याप्रमाणे 12 बॉक्समध्ये ही रक्कम भरण्यात आली होती. कारमधून ही इतकी मोठी रक्कम नेली जात असताना ही कारवाई करण्यात आलीये.