नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस पी त्यागी यांना अटक करण्यात आली आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात त्यागी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  


याच प्रकरणी संजीव त्यागी या त्यांच्या नातेवाईकांसह वकील गौतम खेतान यालाही सीबीआयानं दिल्लीतून अटक केली आहे. हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात छत्तीसशे कोटींची लाच घेऊन व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.