बिदर : कर्नाटकमधील बिदर येथे एका छोट्या साडी व्यापाऱ्याने चक्क एक रुपयांत साडीची ऑफर दिली आहे. एक रुपयात साडी खरेदी करण्यासाठी त्याच्या दुकानासमोर महिलांची मोठी गर्दी उसळली आहे. पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सण, उत्सवानिमित्ताने दुकानात सेल सऱ्हास लावला जातो.  कमी पैशात वस्तू मिळत असेल तर ग्राहकांच्या या सेलवर उड्या पडतात. कर्नाटकमधल्या बिदरमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. नोटाबंदीचा प्रचार करण्यासाठी एका छोट्या दुकानदाराने शक्कल लढवली आणि चक्क १ रुपयात साडीची विक्री सुरु केली. ही बातमी जेव्हा गावात पसरली तेव्हा गावातील महिलांनी साडी खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांग लावली. तर काहींही ऑफिसमधून सुटी घेतली.


दरम्यान, ही साडी खरेदी करताना ग्राहकापुढे एक अट ठेवण्यात आली होती. ग्राहकांनी एक रुपयाची नोट देऊन साडीची खरेदी करायची आहे. या दुकानाचे मालक  चंद्रशेखर पसार्गे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आपल्या दुकानातील सर्व साड्यांची विक्री एक रुपयाला करण्याचे  ठरवले आहे.



आपले नुकसान होत असले तरी मला याची पर्वा नाही. नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी तसेच नवीन वर्षाची भेट म्हणून मी ही सवलत देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही सूट १ लाख साड्यांची विक्री होईपर्यंत सुरू राहणार आहे.