चेन्नई : पूर्व किनारपट्टीवर आलेलं वरदाह चक्रीवादळ आता शमलं, असलं तरी तामिळनाडूमध्ये या वादळानं 18 जणांचे बळी घेतल्याचं आता स्पष्ट झालंय. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये किनारपट्टी भागाला वादळानं जबरदस्त तडाखा दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी अधिकाऱ्यांची आपत्कालिन बैठक घेऊन मदत आणि पुनर्वसनाचं कार्य युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. वादळामुळे टेलिफोन, मोबाईल सेवेला मोठा फटका बसलाय. 


या सेवा तसंच रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वादळ आणि पावसामुळे चेन्नई आणि तिरुवेल्लूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच जण मृत्युमुखी पडलेत. कांचिपूरममध्ये चार तर वेल्लूपुरम आणि थिरुवनमाली जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन बळी गेलेत. 


केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला असून राज्य सरकारला पुनर्वसन कार्यात सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलंय.