मुख्यमंत्री अखिलेश यादवांची मोदींवर टीका
उत्तर प्रदेश निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आता काही वेळात थांबणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात थांबवून आता काम की बात सुरु करावी असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लगावला आहे.
जौनपूर : उत्तर प्रदेश निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आता काही वेळात थांबणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात थांबवून आता काम की बात सुरु करावी असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लगावला आहे.
अखिलेश यादव यांनी सात तर सभा घेतल्या तर पंतप्रधान मोदींचा रोड शो झाला. अखिलेश यादव यांनी म्हटलं की, मोदी उत्तर प्रदेशमध्ये मतांसाठी फिरत आहेत. त्यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी काहीच केलेले नाही. मोदींनी नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात ते असमर्थ ठरले आहेत. उत्तर प्रदेशात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असं मोदी म्हणत आहेत. मग त्यांनी आतापर्यंत त्यांचे सरकार असलेल्या राज्यांमधील शेतकऱ्यांची कर्ज का माफ केली नाहीत? असा सवाल त्यांनी केला.