लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथने आज आपल्या मंत्रिमंडळाचा  विस्तार करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री योगी यांनी गृहमंत्रालय आपल्याकडे ठेऊन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना  सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना उच्च शिक्षण मंत्रालय देण्यात आले.  उत्तर प्रदेशाचे माजी भाजप अध्यक्ष सूर्य प्रताप शाही यांना कृषी मंत्रालय देण्यात आले. 



1. सूर्य प्रताप शाही, कृषी 
2. केशव प्रसाद मौर्य, सार्वजनिक बांधकाम 
3. दिनेश शर्मा, उच्च शिक्षण मंत्रालय
4. मोहसिन रजा, अल्पसंख्यक मंत्रालय आणि आईटी विभाग (अ.प्र) 
5. स्वाति सिंह, महिला आणि  बाल कल्याण मंत्रालय
6. चेतन चौहान, क्रीडा मंत्रालय
7. स्वामी प्रसाद मौर्य, सहकार मंत्रालय
8. रीता बहुगुणा जोशी, माध्यमिक शिक्षा 


9. सुरेश खन्ना, संसदीय कार्य, नगर विकास


10. जय प्रकाश, आबकारी विभाग 


11. सिद्धार्थनाथ सिंह, स्वास्थ्य मंत्रालय


12. आशुतोष टंडन, प्राथिमक शिक्षण 


२० मार्चला यूपीचे सीएम यांनी शपथ घेतली होती. त्यात एकूण ४७ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यात कॅबिनेट मंत्री म्हणून  सूर्य प्रताप शाही, सुरेश खन्ना, स्वामी प्रसाद मौर्य, सतीश महाना, राजेश अग्रवाल, दारा सिंह चौहान, रीता बहुगुणा जोशी, धर्मपाल सिंह ,एस पी सिंह बघेल, सत्यदेव पचौरी, रमापति शास्त्री, जय प्रताप सिंह, ओम प्रकाश राजभर, बृजेश पाठक, लक्ष्मीनारायण चौधरी, चेतन चौहान, श्रीकान्त शर्मा, राजेन्द्र प्रताप सिंह उर्फ मोती सिंह, सिद्घार्थ सिंह, मुकुट बिहारी वर्मा, आशुतोष टण्डन तथा नन्द कुमार नन्दी यांना राज्यपालांनी शपथ दिली. 


तसेच स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणून  अनुपमा जायसवाल, सुरेश राणा, उपेंद्र तिवारी, डॉक्टर महेंद्र सिंह, स्वतंत्रदेव सिंह, भूपेन्द्र सिंह चौधरी, धर्म सिंह सैनी, स्वाति सिंह तसेच अनिल राजभर यांनी स्वतंत्र प्रभारचे राज्यमंत्री पद की शपथ घेतली. राज्यमंत्री म्हणून  गुलाब देवी, मोहसिन रजा, जयप्रकाश निषाद, अर्चना पाण्डेय, जय कुमार सिंह जैकी, अतुल गर्ग, रणवेन्द्र प्रताप सिंह, नीलकंठ तिवारी, गिरीश चन्द्र यादव, बलदेव औलख, मन्नू कोरी,  माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे पूत्र संदीप सिंह, सुरेश पासी को राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.