३० एप्रिलपर्यंत संपत्ती जाहीर करण्याचे योगींचे मंत्र्यांना आदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्र्यांना तसेच अधिकाऱ्यांना लवकरात लवकर संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. योगींच्या या आदेशानंतर मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. मात्र मंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर केली नव्हती.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्र्यांना तसेच अधिकाऱ्यांना लवकरात लवकर संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. योगींच्या या आदेशानंतर मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. मात्र मंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर केली नव्हती.
आदेश दिल्यानंतरही संपत्ती जाहीर न केल्याने नाराज झालेल्या योगी यांनी १९ एप्रिलपर्यंत मंत्र्यांना संपत्ती जाहीर करण्यास सांगितले होते. मात्र तारीख उलटून गेल्यानंतरही अनेक मंत्र्यांनी संपत्ती जाहीर केलेली नाहीये.
त्यामुळे आता मुख्यमंत्री योगी यांनी ३० एप्रिलपर्यंत मंत्र्यांना संपत्ती जाहीर करण्यासाठी अल्टिमेटम दिलाय.