`चिल्लाई कालान`च्या अगोदरच काश्मीरवासी गारठले
काश्मीरला यंदाची थंडीची लाट आता आधिक गहरी झालीय.
काश्मीर : काश्मीरला यंदाची थंडीची लाट आता आधिक गहरी झालीय.
बुधवारपासून काश्मीरमधला कडाक्याच्या थंडीचा 'चिल्लाई कालान' नावानं ओळखला जाणारा 40 दिवसांचा काळ सुरू होतोय. त्याच्या आदल्याच दिवशी काश्मीरवासी गारठलेत.
यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद काल रात्री झाली. राज्याची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये उणे 5.5 अंश सेल्सियल्स तापमानाची नोंद झालीय.
पारा शुन्याच्या खाली गेल्यामुळे दल लेक गोठायला सुरूवात झाली. काश्मीर खोऱ्यातल्या पाणीपुरवठ्यालाही फटका बसलाय.