पणजी : गोव्यात भाजपने बहुमत सिद्ध केले आहे. मनोहर पर्रिकर आपली पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे निरीक्षक नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी काँग्रेसचे आरोप निराधार असून त्यांच्यातील दुफळीमुळे संधी गमावली, असे ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गोवा विधान सभेत सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. 23 लोकांचं समर्थन आम्हाला मिळालं आहे. बहुमत सिद्ध झालं आहे. आमच्यावर आरोप केले होते पण ते निराधार होते सिद्ध झालं आहे.


जी काँग्रेस पार्टी स्वतःचा नेता ठरवू शकत नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. काँग्रेसने संधी गमावली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनामध्ये दुफळी होती. त्यामुळे त्यांनी संधी गमावली. मनोहर पर्रिकर सरकार पाच वर्षे यशस्वीपणे स्थिर सरकार देतील, असे ते म्हणालेत.


ज्यांनी आमच्या आधीही असे प्रयोग अनेकदा केले आहेत त्या काँग्रेसने आम्हाला ज्ञान शिकवू नये, असा टोलाही गडकरी यांनी लगावला. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे, महाराष्ट्रामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी माहिती गडकरी यांनी दिली.