नवी दिल्ली : संसदेत नोटाबंदीच्या चर्चेत पंतप्रधानांनी उत्तर देण्याची विरोधकांची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यापार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. राहुल गांधी या बैठकीचे अध्यक्ष होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सोनिया गांधींची प्रकृती ठीक नसल्यानं राहुल गांधींच्या खांद्यावर ही जबाबदारी आली. या बैठकीत बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधआन नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. 


काश्मीर जळत असताना मोदी गप्प का होते?  सर्जिकल हल्ल्यानंतर सीमेपलीकडून 21 वेळा गोळीबार झाला आहे.  मोदी फक्त टीआरपीचं राजकारण करत असल्याचाही राहुल गांधींनी दावा केला आहे.