नवी दिल्ली : कारच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने प्रचार रॅलीत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.पंजाबच्या भटिंडामध्ये ही दुर्घटना घडली. पंजाबमध्ये काँग्रेसच्या प्रचार रॅली दरम्यान ही दुर्घटना घडली. या घटनेत १० जण गंभीर जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रसचे विधानसभेचे उमेदवार हरमिंदर जस्सी यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान रॅली चालू होती, तेव्हा अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाने रॅलीतील कार्यकर्ते जखमी झाले. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.


या रॅलीमध्ये ही दुर्घटना घडल्याने तिघांना प्राण गमवावे लागले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून जखमींवर उपचार सुरु आहेत. पंजाबमध्ये ११७  विधानसभेच्या जागांसाठी ४  फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे सगळीकडेच सध्या प्रचाराची धूम चालू आहे.