चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध करून काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  गेल्या दहा वर्षात अकाली दल आणि भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं पंजाबचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप मनमोहन यांनी केला आहे.


काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर तातडीनं या धोरणांमध्ये बदल करणार असल्य़ाचं आश्वासन त्यांनी दिलं. तर ड्राग्जच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबला केवळ चार आठवड्यात मुक्त करू असं आश्वासन काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलंय. त्यामुळं आता अकाली दल आणि भाजपच्या जाहीरनाम्यात पंजाबच्या जनतेसाठी काय दडलंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.