नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. बैठकीला जनवेदना संमेलन असं नाव देण्यात आलं आहे.  बैठकीत बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली. भाजपनं रिझर्व्ह बँकेसारख्या स्वायत्त संस्थांवर हल्ला केल्याचा आरोप केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या आत्म्यालाच मोदी सरकरानं घाला घातल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय. या बैठकीचं वैशिष्ठ म्हणजे बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या खुर्चीत राहुल गांधी विराजमान झाले आहेत. राहुल गांधींना अधिकृत रित्या काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलेलं नाही. पण त्यांना आजच पक्षाचं कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात येईल अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगते आहे.