पणजी : काँग्रेस आमदार सत्तास्थापनेसाठी दावा करणार आहेत. काँग्रेस आमदार राज्यपालांची 10 वाजता घेणार भेट घेणार आहेत. तसेच आजच संध्याकाळी 5 वाजता होणारा भाजप सरकारचा शपथविधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसने सस्तास्थापनेचा दावा करण्याआधीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर संध्याकाळी पणजीत शपथ घेणार आहेत. राजभवनवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पर्रीकर यांच्या बरोबर  भाजपचे चार, मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रत्येकी दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. दोन अपक्ष आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. पर्रिकरांना राष्ट्रवादी आणि आणखी एका आमदाराने पाठींबा दिल्याने भाजपचा सरकार बनविण्याचा मार्ग आणखीनच प्रशस्त झालाय. 


भाजपतर्फे पांडुरंग मडकईकर ,माविन गुदिनो, मायकल लोबो, डॉ प्रमोद सावंत यांना मंत्री बनविण्यात येणार आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि बाबू आजगावकर शपथ घेतील. गोवा फॉरवर्ड पार्टीतर्फे विजय सरदेसाई आणि विनोद पालियेकर यांना मंत्रिमंडळात घेण्यात येणार आहे. तर अपक्ष आमदार गोविन्द गावडे आणि रोहन खंवटे पहिल्यांदाच मंत्रिपदावर विराजमान होतील.