हैदराबाद : एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आंधप्रदेशचे समाजकल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशील रावेला असे आरोपीचे नाव असून, बंजारा हिल्स पोलिसांनी रविवारी सकाळी त्याला अटक केली. संबंधित महिलेचा पाठलाग करून तिला गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 


बंजारा हिल्स येथील रस्ता क्रमांक १३ वर चालत जात असतांना कारमधील दोघांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. 


महिलेने तक्रार केल्यानंतर आणि प्रकरण लोकांसमोर आल्यानंतर पोलिसांनी आंध्रप्रदेशमधील मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला नोटीस पाठवली होती.


कारमध्ये बसलेले दोघेही महिलेला कारमध्ये येण्यास सांगत होते आणि त्यानंतर त्यांनी महिलेचा हात देखील पकडला त्यानंतर महिलेने आरडाओरड केल्याने तेथे लोकं जमली आणि या दोघांना पोलिसांच्या हवाले करण्यात आलं. 


पोलिसांने या दोघांची चौकशी केल्यानंतर एक हा मंत्र्याचा मुलगा असल्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली गेली नव्हती, पण मीडियातून बातमी समोर आल्यानंतर तक्रार केली गेल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.


पीडितेच्या कुटुंबीयांनी, महिला संघटना आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी या मंत्रीपुत्राला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली होती.