नवी दिल्ली : आपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेर निवळला आहे. आप नेते कुमार विश्वास यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आलं आहे. कुमार विश्वास यांच्यावर टीका करणारे आमदार अमानतुल्लाह यांची पक्षानं हकालपट्टी केली आहे. इतकच नाही तर कुमार विश्वास यांची पक्षाचा राजस्थानचा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली महापालिकेत झालेल्या दारूण पराभवानंतर आम आदमी पार्टीतले मतभेद चव्हाट्यावर आले होते. आपचे ओखलाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी विश्वास यांच्यावर टीका केली होती. विश्वास हे संघ-भाजपाचे एजंट असून पक्षामध्ये दुही माजवत असल्याचा आरोप खान यांनी केला होता.


आपचे ओखलाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी विश्वास यांच्यावर टीका केली होती. विश्वास हे संघ-भाजपाचे एजंट असून पक्षामध्ये दुही माजवत असल्याचा आरोप खान यांनी केला होता.


आपल्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पक्षाचा समन्वयक व्हायची बिलकूल इच्छा नाही. मात्र आपल्याविरुद्ध षड्यंत्र रचलं गेलं असून खान यांचा बोलवता धनी वेगळाच असल्याचा आरोप विश्वास यांनी केला होता.