पणजी : गोवा क्रिकेट असोशिएशनच्या कारभारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. याप्रकरणी गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गोवा क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांना अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल दिवसभर या तिघांची कसून चौकशी केल्यावर संध्याकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आलीय. गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गोवा क्रिकेट असोशिएशनचे आजीव सभासद विलास देसाई यांच्या तक्रारीनंतर 3 जूनला याप्रकरणी एफआयआर दाखल केली. 2006 ते 2008 या काळात खोट्या सह्या करून चेतन देसाई आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी एक बँक खातं उघडलं. बँक खात्याच्या माध्यमातून गोवा क्रिकेट असोशिएशनचे 3 कोटी 13 लाख रुपये खिशात घातल्याचा आरोप आहे.


लोकांनी वीज चोरी स्वताहून थांबवावी यासाठी उर्जामंत्रालयातर्फे गांधीगिरी करण्यात येणार आहे.. याउपक्रमाद्वारे वीज चोरी करणा-याला फूल देण्यात येईल आणि शाब्बासकी देऊन लज्जीत करण्यात येईल.. आज से नो बिजली चोरी, शुरु करे ऊर्जागिरी असं या उपक्रमाचं स्लोगन असेल.. आज आणि उद्या गोव्यात सर्व राज्यांच्या उर्जा मंत्र्यांची बैठक होतीये. या बैठकीत उर्जामंत्री पियुष गोयल हे अभियान जाहीर करतील..