मुंबई : सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या कंपन्यांमधून गच्छंती सुरूच आहे. मिस्त्री यांना टाटा स्टील या कंपनीच्या चेअरमनपदावरूनही हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागेवर स्वतंत्र संचालक असलेल्या ओ पी भट यांची चेअरमनपदी नियुक्त करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिन्याच्या 11 तारखेलाच यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यासंदर्भात आज अधिकृत घोषणा करण्यात आली. ओ पी भट हे एसबीआयचे माजी चेअरमन आहेत. आगामी विशेष सर्वसाधारण सभा नि:पक्षपणे व्हावी यासाठी भट यांची नियुक्ती करण्यात आल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे.


25 डिसेंबरला विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. या सभेत सायरस मिस्त्री आणि नुस्ली वाडिया यांना संचालक पदावरून देखील हटवण्यात येणार आहे.