भुवनेश्वर : आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल १० किमीची पायपीट करणाऱ्या ओडिशाचा गरीब आदिवासी दाना मांझीला बहारिनच्या पंतप्रधानांकडून मदत मिळालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहारिनचे पंतप्रधान प्रिंस खलिफा बिन सलमान अल खलिफा यांनी ८ लाख ८७ हजार रुपयांची मदत केलीये. ही मदत आपल्या तीन मुलींच्या भविष्यासाठी बँकेत जमा कऱणार असल्याचे मांझी यावेळी म्हणाले. 


२४ ऑगस्ट रोजी अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने पत्नीचा मृतदेह घेऊन त्यांना तब्बल १० किमी पायपीट करावी लागली होती. ही घटना समोर आल्यानंतर विविध स्तरातून त्यांना मदतीचा हात पुढे होऊ लागला. सुलभ इंटरनॅशनल यांच्याकडून मांझीला ५ लाखांची मदत करण्यात आलीये. गुजरातमधील एका हिऱ्या व्यापाऱ्यानेही मांझीला २ लाखांची मदत केलीये.