भटिंडा : लग्नामध्ये 22 वर्षांच्या डान्सरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यामध्ये घडली आहे. गोळी झाडणारा आरोपी दारू प्यायला असल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भटिंडा जिल्ह्याच्या मौरमध्ये शनिवारी रात्री हे लग्न होतं. या लग्नामध्ये कुलविंदर कौर ही तिच्या ट्रूपसोबत डान्स करत होती, तेव्हा तिच्यावर मुलाकडच्या नातेवाईकाकडून गोळीबार करण्यात आला. लग्नामध्ये काही जण हवेत गोळीबार करत होते. त्यांना स्टेजवर जाऊन डान्स करायचा होता, पण अडवल्यामुळे यांच्यापैकी एकानं हा गोळीबार केला, यातली एक गोळी कुलविंदरच्या डोक्याला लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबाराचा हा सगळा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.


बिल्ला हा या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. बिल्लाबरोबरच आणखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातले तिनही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा आणि त्यांच्या नावाचा शोध घेत आहेत. 


पाहा गोळीबाराचा हा धक्कादायक व्हिडिओ