जम्मू काश्मीर : पाकिस्तानी सेनेकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार सिंह यांच्या पार्थिवावर शनिवारी अंतिम संस्कार करण्यात आले. पिता शहीद झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी म्हटलं की त्यांचे वडील आता नाही राहिले. आता पंतप्रधान मोदी हेच आमचे पिता असं त्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहीद जितेंद्र कुमार सिंह यांची मुलगी अर्चनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की, पंतप्रधानांनी त्यांच्या परिवाराची मदत करावी. आम्हालाही सीमा सुरक्षा दलात भरती व्हायचंय कारण आम्ही पाकिस्तानकडून त्याचा बदला घेऊ शकू.


वडील शहीद झाल्यानंतर ती म्हणते की, पंतप्रधान मोदीच आता आमचे पिता आहेत आणि त्यांनी आमची जबाबदारी घ्यावी. माझं कुटुंब गरीब आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक मदत करावी. पंतप्रधानांकडून आशा असल्याचं देखील तिने म्हटलंय.


शहीद जितेंद्र कुमार यांना २ मुली आणि एक मुलगा आहे. एक मुलगी दहावी, दुसरी मुलगी सातवी तर मुलगा चौथीमध्ये शिकतोय.