मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलामांच्या पहिल्या स्मृतिदिनी राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन आज रामेश्वरममध्ये करण्यात आलं. संरक्षण मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कलाम यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'मिशन ऑफ लाईफ' नावाच्या एक प्रदर्शनही यानिमित्तानं भरवण्यात आलंय. 


अबुल पाकिर जैनुलाबदीन अब्दुल कलाम हे त्यांचं खरं नाव... 'मिसाईल मॅन' म्हणून ओळख असणाऱ्या अब्दुल कलामांची राष्ट्रपती म्हणून देखील कारकीर्द मोलाची ठरली. 


भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमातलं त्यांचं योगदान मोलाचं होतं. पोखरणमध्ये घेण्यात आलेल्या अण्वस्त्र चाचणीची मुख्य जबाबदारी कलामांनी पार पाडली होती. त्यानंतर २००२ ते २००७ या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं.


राष्ट्रपतीपदाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी पुन्हा प्राध्यापकी सुरू केली होती. शिलाँगच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'मध्ये ते व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून काम करायचे. 


कलामांचं 'विंग्ज ऑफ फायर' हे पुस्तकदेखील जगभरात नावाजलं गेलंय. त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी रामेश्वरममधल्या त्यांच्या स्मृतीस्थळाला नागरिक भेट देतायत.