मुंबई : मुंबईहून दिल्ली प्रवास कऱणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आता केवळ १२ तासांत तुम्ही मुंबईहून दिल्लीपर्यंत प्रवास करु शकता. देशातील सर्वाधिक वेगाने धावणाऱ्या  टॅलगो ट्रेनची आजपासून दिल्ली ते मुंबई चाचणी घेण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून ही चाचणी सुरु केली जाणार असून ५ ऑगस्टपर्यंत ही चाचणी सुरु राहील. दिल्लीहून रात्री आठ वाजता ही रेल्वे निघेल. त्यानंतर उद्या सकाळी आठ वाजता ती मुंबईत दाखल होणं अपेक्षित आहे. 


यापूर्वीच या टॅलगो ट्रेनची यापूर्वीच पहिली चाचणी मे महिन्यात बरेली ते मोरादाबाद घेण्यात आलेली आहे. आणि दुसरी चाचणी पालवाल ते मथुरापर्यंत घेण्यात आली होती. 


टॅलगो ही स्पेनच्या माद्रिदमध्ये तयार करण्यात आलेली सर्वाधिक जलद धावणारी रेल्वे आहे. नऊ बोगी असलेल्या या रेल्वेमुळं प्रवाशांना दिल्ली ते मुंबईचा प्रवास केवळ 12 तासांत करता येणार आहे. 


या रेल्वेत दोन विशेष बोगी असणार आहेत. तर खुर्च्यांचे चार बोगी असणार आङे. तसंच कॅफेटरियाचीही सोय या रेल्वेत करण्यात आली आहे.