मेरठ : केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरठमध्ये एका इंजीनियरच्या घरात तब्बल 2 कोटी 67 लाख रुपयांचे घबाड सापडलेय. मेरठमधील सरकारी कार्यालयात इंजिनियर पदावर काम करणा-या आर के जैन यांच्या घरी आयकर विभागाचा छापा टाकला.


आयटी विभागाने टाकलेल्या छाप्यात 2 कोटी 67 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीये. जप्त करण्यात आलेल्या या रकमेत 17 लाख रुपयांच्या नव्या नोटांचा समावेश आहे.