लखनऊ : नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांना २ लाखांची मदत करण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे. मात्र, नोटाबंदीवरुन उत्तरप्रदेशमध्ये राजकारण सुरु झाले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जाहीर केले. अलीगढमध्ये ४५ वर्षीय रझिया या महिलेने २० नोव्हेंबरला स्वत:ला जाळून घेतले होते. मोलमजुरी करणाऱ्या रझिया यांना पाचशेच्या सहा जुन्या नोटा बदलून हव्या होत्या. त्यांनी पाच दिवस विविध बँकांमध्ये फेऱ्ही मारल्या. पण त्यांना नोटा बदलून मिळत नव्हत्या. नाराज झालेल्या रझियांनी स्वत:ला संपविले.


रझिया यांच्या कुटुंबीयांना उत्तरप्रदेश सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री अखिलेश यादव त्यांनी जाहीर केले. याशिवाय नोटाबंदीमुळे मृत्यू झालेल्यांच्या  कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये एटीएम किंवा बँकेच्या रांगेत उभे असताना जीव गमावलेल्यांचाही समावेश असेल असे त्यांनी स्पष्ट केले.