`नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा मोदींना शाप लागेल`
नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाप लागेल अशी टीका द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे.
नरसिंहपूर : नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाप लागेल अशी टीका द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे. मोदींचं राज्य हे इंग्रजांपेक्षा वाईट आहे, मोदी सेवक नाहीत तर खलनायक आणि हुकूमशाहा आहेत असा आरोपही शंकराचार्यांनी केला आहे.
स्वातंत्र्यापासूनचा हिशोब मागणारे मोदी कोण आहेत. हा देश कायद्यानं आणि राज्यघटनेनुसार चालेल असंही शंकराचार्य म्हणाले आहेत.