नोटबंदीचा फटका उद्योगाला, उत्पादकता घसरली
नोटाबंदीचा फटका देशाच्या उत्पादनाला बसल्याचं स्पष्ट झालंय.
नवी दिल्ली : नोटाबंदीचा फटका देशाच्या उत्पादनाला बसल्याचं स्पष्ट झालंय. 8 महत्त्वाच्या उद्योगांची उत्पादकता वाढ नोव्हेंबरमध्ये 4.9 टक्क्यांपर्यंत घसरलीये. ऑक्टोबरमध्ये हीच वाढ 6.6 टक्क्यांवर होती.
या आठ उद्योगांचा औद्योगिक उत्पादकता निर्देशांकामध्ये अर्थात IIPमध्ये तब्बल 34 टक्क्यांचा वाटा आहे. रिफायरनरीला नोटाबंदीचा सर्वाधिक फटका बसलाय. या उद्योगाच्या वाढीचा दर 15.1 टक्क्यांवरून थेट 2 टक्क्यांपर्यंत खाली घसरलाय. त्याखालोखाल स्टील, सिमेंट, खतनिर्मिती यांचा विकासदरही मोठ्या प्रमाणात घटलाय.