नवी दिल्ली : मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच मंत्रीमंडळाचा विस्तार केला आणि काही मंत्र्यांची खाती देखील बदललीत. जयंत सिन्हा यांचं देखील खातं बदलण्यात आलं आहे. अर्थ खात्यावरुन हटवून त्यांना नागरी उड्डान खातं देण्यात आलं आहे. जयंत सिन्हा यांच्या या खातं बदलीसाठी त्यांची पत्नी पुनीता सिन्हा कारण असल्याचं म्हटलं जात आहे. या बदलीनंतर जयंत सिन्हा यांच्या घरपी झालेल्या चहा पार्टीच्या चर्चा आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ मे रोजी अर्थ मंत्रालयाशी संबंधित सदस्य आणि काही बँकांच्या प्रमुखांना त्यांनी चहा पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. या चहा पार्टीमध्ये अर्थमंत्री अरुण जेठली यांच्यासोबतच सरकारी बँकांचे सीईओ देखील उपस्थित होते. जयंत सिन्हा यांची पत्नी ज्या एक इनवेस्टमेंट बँकर आणि मार्केट तज्ज्ञ देखील आहेत त्या देखील या पार्टीत उपस्थित होत्या.


पुनीता यांनी या चहा पार्टीमधल्या काही गुपीत गोष्टींवर एका इंटरव्यूमध्ये म्हटलं की, घरी चहा पार्टी ठेवण्यासाठी जयंत सिन्हा यांनी अरुण जेठली यांची परवानगी घेतली होती आणि त्या एक होस्ट म्हणून त्या पार्टी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी म्हटलं की माझ्या वैयक्तिक इंवेस्टमेंट कंपनींमध्ये मी  डायरेक्टर या पदावर आहे त्याचा माझ्या पतीशी काहीही संबंध नाही. या कंपन्यांच्या निर्णय घेण्याच्या प्रकियेत माझा कोणताच संबंध नाही. 


पुनीता यांनी म्हटलं की, माझं स्वत:चं एक वेगळं यशस्वी करिअर आहे. यामध्ये माझ्या पतीचं काहीही योगदान नाही. माझ्या करिअरला या गोष्टीचा फरक नाही पडत की ते कोणत्या खात्याय कार्यरत आहेत. मी आज जेथे आहे ते माझ्या स्वतःच्या पायावर आहे. 


या चहा पार्टीमध्ये पत्नी पुनीता सिन्हाच्या उपस्थितीमुळे आणि खासगी कंपन्याचे त्या डायरेक्टर असल्याने जयंत सिन्हा यांचं खातं बदललं गेलं. पुनीता सिन्हा यांनी इंग्रजी वृत्तपत्र टेलीग्राफला दिलेल्या इंटरव्यूमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत.