तामिळनाडूत तुरुंग उपाधीक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा
तामिळनाडूमधील एक तुरुंग उपाधीक्षकाचा गणवेशात मद्यधुंद अवस्थेत डान्स करत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सालेम जिल्ह्यातल्या अत्तूरचे तुरुंग उपाधीक्षका शंकरन यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आलंय. पाहा व्हिडीओ बातमीच्या खाली
चेन्नई : तामिळनाडूमधील एक तुरुंग उपाधीक्षकाचा गणवेशात मद्यधुंद अवस्थेत डान्स करत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सालेम जिल्ह्यातल्या अत्तूरचे तुरुंग उपाधीक्षका शंकरन यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आलंय. पाहा व्हिडीओ बातमीच्या खाली
विशेष म्हणजे राजधानी चेन्नईमध्ये झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात शंकरन सहभागी झाले होते. त्यानंतर त्याच रात्री एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी रंगली होती.
या पार्टीत गणवेशात नाचणाऱ्य शंकरन यांचा व्हिडिओ त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईलवर शूट केला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर तुरुंग अधीक्षक शण्मुखसुंदरम यांनी शंकरन यांचं निलंबन केलंय.