नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्याला हात घातला. मोदींच्या या भाषणावर टीका करताना काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. 


पत्रकारांशी बोलताना दिग्विजयसिंग यांनी जम्मू काश्मीरला भारत व्याप्त काश्मीर असा उल्लेख केला. पत्रकारांनी दिग्विजयसिंग यांची ही चूक लक्षात आणून दिली. यानंतर दिग्विजयसिंग यांनी सारवासारव केली आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं स्पष्टीकरण दिलं. 


पाहा काय म्हणाले दिग्विजयसिंग