`नोटबंदीनंतर प्रत्यक्ष करात 14 टक्क्यांची वाढ`
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. नोटाबंदीनंतर प्रत्यक्ष करात 14 टक्क्यांनी वाढ झाली, तर अप्रत्यक्ष करात 26 टक्क्यांनी वाढ झाल्याचं अर्थमंत्री म्हणाले आहेत.
नोटांबदीला संपूर्ण देशाचा पाठिंबा लाभल्याचं सांगत, त्याकरता त्यांनी देशवासीयांचे आभारही मानले. तसंच नोटबंदीचा कठीण टप्पा आता पार झाला आहे. आता यानंतर सगळं सुरळीत होईल, हे सांगायलाही अरुण जेटली विसरले नाहीत.