चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत गेल्या काही दिवसांबाबत तर्कवितर्क काढले जात होते, पण आता जयललितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 


जयललितांच्या रक्तात झालेला संसर्ग त्यांच्या अवयवांपर्यंत पोहोचला, यामुळे जयललितांना श्वास घेणं कठीण झालं. जयललितांना मधूमेह असल्यामुळे त्यांच्या अवयवांनीही काम करणं बंद केलं होतं. एकेक अवयव निकामी होत गेल्यामुळे जयललितांचा मृत्यू झाल्याचं अम्मांवर उपचार करणारे डॉक्टर रिचर्ड बेलेंनी सांगितलं आहे.