कुत्रे, माकडांच्या जाचातून सुटण्यासाठी केंद्राने मागविल्यात चक्क सूचना
देशाचं धोरण आणि निती ठरवण्याऱ्यापुढं सध्या डोकेदुखी आहे ते कुत्रे आणि माकडांची.
नवी दिल्ली : देशाचं धोरण आणि निती ठरवण्याऱ्यापुढं सध्या डोकेदुखी आहे ते कुत्रे आणि माकडांची. ही चर्चा आहे दिल्लीत वास्तव्याला असलेल्या खासदारांची. केंद्रातील मोदी सरकारने हा उपद्रव टाळण्यासाठी सूचना मागविल्यात.
कुत्रे आणि माकडांच्या समस्येपासून सुटका होण्यासाठी जनतेकडूनच सरकारने आता सूचना मागवल्या आहेत. यासाठी राज्यसभेच्या सचिवालयातर्फे वृत्तपत्रातून जाहिरात देण्यात आलीय.
दिल्लीत खासदारांच्या निवासस्थानी कुत्रे आणि माकडांना आवर घालण्यासाठी सूचना मागवत असल्याचे नमूद करण्यात आलंय. राज्यसभेच्या निवारा समितीने या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून सूचना मागवल्या आहेत.
लिखित अथवा तोंडी स्वरूपात या सूचना दिल्या जाऊ शकतात. सूचनांसाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आलीय.