बँकांमधून सारखे पैसे काढू नका, आरबीआयचं नागरिकांना आवाहन
बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली आहे.
मुंबई : बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी संयम राखावा, असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं जनतेला केलं आहे.
कमी मूल्याच्या पुरेशा नोटा बँकांमध्ये आहेत त्यामुळे चिंता करु नका, संयम राखा आणि बँकांतून सारखे पैसे काढू नका असं आवाहन आरबीआयनं जनतेला केलं आहे.