नवी दिल्ली : पूर्व भारतात आणि बांगलदेशावर भीषण भूकंपाचा धोका असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. भविष्यात बांगला देश आणि पूर्व भारतात भूकंपामुळे हाहाकार उडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ९ पेक्षा जास्त जाऊ शकते, यामुळे हाहाकार उडण्याची शक्यता आहे, या भूकंपाचा परिणाम दोन देशातील १४ कोटी लोकांवर होवू शकतो.


मीडियात आलेल्या काही रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांनी भूकंपाची तीव्रता ८.२ ते ९ च्या दरम्यान असू शकते असं म्हटलं आहे. मात्र हा भूकंप कोणत्या वर्षी किंवा कधी होईल, याविषयी शास्रज्ञांनी काहीही सांगितलेले नाही.