नवी दिल्ली : देशभरातील 50 बँकेच्या शाखेमध्ये ईडीने छापे मारले आहेत.  हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगची माहिती मिळाल्यानंतर छापे मारले गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीमुळे रोजच्या कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ईडीने त्या सर्व खात्यांवर नजर ठेवली आहे ज्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा केला गेला आहे.


मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय घेतला होता. 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर नवीन 500 आणि 2000 च्या नव्या नोटा आल्या आहेत. त्यानंतर ज्या लोकांनी काळा पैसा लपवण्याचा किंवा सफेद करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई होतांना देशभर दिसत आहे.