विजय मल्यांविरोधात गुन्हा दाखल
उद्योजक विजय मल्या आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या मुख्य वित्त अधिकाऱ्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘मनी लॉण्ड्रिंग’चा गुन्हा दाखल केला आहे.
नवी दिल्ली : उद्योजक विजय मल्या आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या मुख्य वित्त अधिकाऱ्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘मनी लॉण्ड्रिंग’चा गुन्हा दाखल केला आहे.
सुमारे ९०० कोटींच्या कर्जबुडवेगिरीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीबीआयने मल्यांविरोधात भ्रष्टाचार आणि फौजदारी षड्यंत्राचा गुन्हा नोंदवून मुंबई, बंगळुरू आणि गोव्यात छापे मारले होते.
किंगफिशर एअरलाइन्सच्या आर्थिक स्थितीबाबत लेखापरीक्षकांच्या अंतर्गत अहवालात प्रतिकूल निरीक्षण नोंदवल्यानंतरही आयडीबीआय बँकेने मल्याना कर्ज दिल्याचे सीबीआय तपासात स्पष्ट झाले आहे. या बँकेसह अन्य १७ बँकांकडून मल्यांनी कर्ज घेतले आहे.
किंगफिशर एअरलाइन्ससाठी घेतलेले कर्ज एकरकमी फेडण्याबाबत बँकांशी चर्चा करीत असल्याचे मल्याने सांगितले असतानाच डीआरटीने हा निर्णय दिला आहे. तपास यंत्रणेच्या ठपक्यानंतर गती केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांनी मुंबईत बँक प्रमुखांच्या एका बैठकीत मल्याबाबत बँकांनी चालढकल केल्याचा ठपका ठेवला होता.
डियाजिओकडून ५१५ कोटी घेण्यास ‘डीआरटी’चा मज्जाव मद्यसम्राट विजय मल्या यांना कर्ज पुनर्रचना लवादाने (डीआरटी) सोमवारी दणका दिला. स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्जबुडीत प्रकरण मिटेपर्यंत मल्या यांना डियाजिओकडून ५१५ कोटी रुपये मिळू शकणार नाहीत, असे डीआरटीने स्पष्ट केले.