खडसेंना मंत्रिमंडळातून वगळलं जाण्याची शक्यता
डागळलेली प्रतिमा, शिवसेनेचा दवाब यांच्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : एकनाथ खडसे रात्रीपर्यंत राजीनामा देणार, झी २४ तासच्या सुत्रांची माहिती, डागळलेली प्रतिमा, शिवसेनेचा दवाब यांच्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
एकनाथ खडसे यांचा महसूल मंत्री म्हणून आज शेवटचा दिवस असल्याचंही सांगण्यात येत आहे.
एकनाथ खडसेंबाबत जो अहवाल आला आहे, त्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष यांना दिली आहे, त्यापुढचा निर्णय पक्ष करेल - देवेन्द्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत खडसेंवर कारवाई करण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे.