नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या असं पत्र निवडणूक आयोगानं कॅबिनेट सेक्रेटरी यांना पाठवल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र यानंतर तीनच दिवसांत 5 राज्यांच्या निवडणुका होत असल्यानं अर्थसंकल्प पुढे ढकलला जावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.


अर्थसंकल्प कधी सादर करावा किंवा त्याच्या तारखांत बदल करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसल्याचं आयोगानं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे विरोधाकांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता आयोगानं केंद्र सरकारला  अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या असं बजावलंय. आता अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच सादर होणार की पुढे ढककला जाणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.