कोणाला मिळणार समाजवादी `सायकल`? आज होणार चित्र स्पष्ट
समाजवादी पक्षाचं सायकल हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याचा आज केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या दोघांनीही सायकवर आपला दावा सांगितला आहे.
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचं सायकल हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याचा आज केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या दोघांनीही सायकवर आपला दावा सांगितला आहे.
शुक्रवारी निवडणूक आयोगानं दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. मात्र त्यावेळी आपला निर्णय निवडणूक आयोगानं राखून ठेवला होता. दरम्यान उद्यापासून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला आज निर्णय जाहीर करावा लागणार आहे.