पणजी : भारतीय नौदलाच्या आयएनएस विराटला रविवारी दुपारी आग लागली. या आगीत एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. 


चीफ इंजिनिअरिंग मेकॅनिक आशु सिंग यांना गोव्यातील नौदलाच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. इतर 3 खलाशांवर उपचार सुरु आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. आयएनस विराट यावर्षी सेवेतून निवृत्त होतं आहे. 
 
आयएनस विराट सध्या गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तैनात आहे. दुपारच्या सुमारास बॉयलर रुममधून वाफेची गळती झाल्यामुळे ही आग लागली. आगीवर तात्काळ नियंत्रण आणण्यात आलं. मात्र धुरामुळे उपस्थित ४ खलाशांचा श्वास गुदमरला, अशी माहिती देण्यात आली आहे.