नवी दिल्ली :  पतीला बराच काळ सेक्सला नकार देणे आणि योग्य कारण न देणे ही मानसिक क्रूरता आहे. हे घटस्फोटाचा आधार होऊ शकतो, दिल्ली हायकोर्टाने पत्नीकडून घटस्फोट मागणाऱ्या पतीच्या याचिकेवर हा निकाल सुनावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचिकाकर्त्याने तक्रारीत म्हटले की त्याची पत्नी गेल्या साडेचार वर्षापासून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवत नाही आणि मानसिक त्रास देत आहेत.  तसेच पत्नी कोणत्याही शारीरिक अपंगातेची शिकारही नाही. 


हायकोर्टाने पतीकडून निकाल देताना खालच्या कोर्टात पत्नीने केलेल्या आरोपांचे खंडन केले. हायकोर्टाच्या खंडपीठाने सांगितले की, कोर्टात झालेल्या चर्चेला गृहीत धरून पतीने सिद्ध केले की पत्नी त्याचा मानसिक छळ करत होते. एकाच घरात राहून कोणतेही कारण न देता पत्नी बराच काळ सेक्सला नकार  दिला आहे. तसेच ती शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. 


पतीने हायकोर्टात सांगितले की, त्याचे लग्न २६ नोव्हेंबर रोजी हरियाणात झाले. त्याला दोन मुलं आहेत.  २०१३ मध्ये घटस्फोटाचा अर्ज केला तेव्हा ते १० आणि ९ वयाचे होते. पतीनुसार पत्नी घऱातील कोणतेही काम करत नव्हती.