खुशखबर, पीएफवर मिळणार ८.८ टक्के व्याज
सेवा निवृत्ती निधी अर्थात ईपीएफवर ८.८ टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आधी पीएफवर ८.७५ टक्के व्याज मिळत होता. त्यात वाढ करण्यात आलेय.
नवी दिल्ली : सेवा निवृत्ती निधी अर्थात ईपीएफवर ८.८ टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आधी पीएफवर ८.७५ टक्के व्याज मिळत होता. त्यात वाढ करण्यात आलेय.
पीएफवर २०१३ - २०१४ आणि २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात ८.७५ टक्के व्याज देण्यात आले. ६ कोटींपेक्षा जास्त पीएफधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, पीएफवर ८.९५ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र, सध्या ८.७५ टक्के व्याजदर होता. २०१३ - २०१४ आणि २०१५-२०१६ या वर्षांसाठी व्याज दर वाढविण्याची शिफारस करण्यात आली होती.