EPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
भविष्य निर्वाह निधीने जारी केलेल्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबरच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी फॉर्म 10 डी नावाचा नवा फॉर्म तयार करण्यात आला आहे.
ईपीएफओने जारी केलेल्या पत्रकानुसार पेन्शन स्कीमचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना आता यासंबंधीची पूर्वसंमती कंपनीकडून घ्यावी लागणार नाही. यूएनएन, आधार आणि बँकेच्या खात्याची माहिती आणि सोबत कंपनीकडून मिळालेल्या डीजिटल सही असली की कर्मचाऱ्यांना आपल्याला किती पेन्शन मिळाली हे निश्चित करता येणार आहे.
प्रत्येक कंपनीला तिने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून घेतलेला भविष्य निर्वाह निधी ईपीएफओकडे जमा करावा लागतो. हा निधी आता केंद्र सरकारच्या अर्थविषयक व्यवहारांसाठी तयार केलेल्या PayGov या पोर्टलच्या सहाय्याने जमा करता येणार आहे. यामुळे एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेला पीएफ ईपीएफओकडे अद्याप भरला नसेल तर तो या पोर्टलच्या मदतीने भरता येणार आहे. पीएफ जमा करण्याची जबाबदारी केवळ भारतीय स्टेट बॅंकेला देण्यात आली आहे.