निवडणुकीच्या मैदानात श्रीसंत क्लीनबोल्ड
क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले.
तिरुअनंतपुरम : क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले.
श्रीसंत तिरुअनंतपुरम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत होता. मात्र श्रीसंतला मतदाराराजाने साफ नाकारले.
तिरुअनंतपुरम मतदारसंघातून काँग्रेसचे व्ही.एस शिवाकुमार यांनी बाजी मारलीये. तर दुसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट अँटनी राजू आहेत. श्रीसंत तिसऱ्या स्थानावर ढकलला गेलाय.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान श्रीसंत नेहमीच वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहत असे. २०१३मध्ये श्रीसंतला आयपीएल ६मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता मात्र बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली.