फर्रुखाबाद : माजी परदेश मंत्री सलमान खुर्शीद यांच्या फर्रुखाबाद स्थित घरात चोरी झालीय. घराचं टाळं तोडून चोरट्यांनी लाखोंचं सामान लंपास केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, खुर्शीद यांच्या कायमगंज स्थित घराचं टाळं तुटल्याचं चौकीदाराच्या लक्षात आलं... आतमध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. यानंतर चौकीदारानं माजी केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.


खुर्शीद यांच्या घरातून गायब झालेल्या वस्तूंमध्ये काही सोन्या - चांदीच्या वस्तूही आहेत. उल्लखनीय म्हणजे गेल्या वर्षी पितौरामध्ये खुर्शीद यांचे काका तसंच माजी राष्ट्रपती झाकिर हुसैन यांच्या निर्माणधीन संग्रहालयमध्येही चोरी झालीय.