नवी दिल्ली : मुलगी घरी उशीरा आल्यामुळे वडिलांनी मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या पालम भागात राहणारी पीडित तरुणी आपल्या मावशीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली होती. रात्री घरी परतण्यासाठी उशीर झाल्यामुळे घरचे त्या तरुणीला खूप ओरडले, यादरम्यान स्वयंपाक घरातील चाकू घेऊन वडिलांनी तिच्यावर हल्ला केला आहे.


या तरुणीच्या पाठीवर आणि मानेवर हल्ल्यामुळे ती जख्मी झाली आहे. या घटनेची तक्रार तरुणीने पोलिसांकडे केली आहे