पित्याने आपल्या 10 वर्षाच्या लहान मुलीबरोबर केल दुष्कृत्य
मध्यप्रदेशातील मुरैना गावात एका पिताने आपल्या 10 वर्षाच्या लहान मुलीबरोबर दुष्कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.
भोपाळ: मध्यप्रदेशातील मुरैना गावात एका पिताने आपल्या 10 वर्षाच्या लहान मुलीबरोबर दुष्कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.
आरोपी गिरराज तोमर हा नेहमी आपल्या लहान मुलीला त्रास देऊन तिच्याबरोबर दुष्कर्म करायचा, त्यामुळे आरोपी गिरराज तोमरच्या पत्नीने त्याच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी गिरराज तोमर घरातून फरार झाला आहे. आरोपी गिरराज तोमरने बुधवारी दारुच्या नशेत घरी येऊन आपल्या 10 वर्षाच्या लहान मुलीबरोबर अश्लील दुष्कृत्य केले होते.
आरोपी गिरराज तोमरने याआधी पण त्या चिमुकलीबरोबर दुष्कृत्य केलं असल्याचं मुलीची आई आणि आजी-आजोबांनी म्हटलं आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी गिरराज तोमर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपी गिरराज तोमरला पोलीस शोधत आहे.