नवी दिल्ली : गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. योगी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. उत्तराखंडमध्ये राहणारे योगींचे पिता आनंद सिंह बिष्ट यांनी म्हटलं की, 'आज मी खूप आनंदात आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मुलगा त्याच्या इच्छेनुसारच काम करेल तर ते ठीक असतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्यनाथ यांच्या वडिलांनी म्हटलं की, 'महंत अवैद्यनाथ यांचे लक्षण योगीमध्ये आले आहेत. मी त्याला समजवलं आहे की, सर्व समभाव ठेव. आता तू मोठ्या पदावर आहे. कोणासोबतही चुकीचा व्यवहार करु नकोस. मुस्लीमांशी भेदभाव नको करु.'


योगींच्या आईला जेव्हा प्रश्न विचारला की तुमचा मुलगा आता मुख्यमंत्री झाला आहे तुम्हाला काय वाटतंय यावर त्यांची आई भावूक झाल्या. त्यांनी म्हटलं की अजून योगीसोबत बोलणं झालेलं नाही. योगींचा भाऊ म्हणतो की, 'मी खूप लहान होतो. बालपणाच्या आठवणी आठवत देखील नाही. जेव्हा काही कळू लागलं तेव्हा आदित्यनाथ महंत झाला होता. तो घरात खूप कमी राहायचा.'


योगींचे मोठे भाऊ मनेंद्र मोहन बिष्ट देखील बोलतांना भावूक झाले. त्यांनी म्हटलं की, माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यांनी कधी नाही सांगितलं की तो संत बनेल. आम्हाला तर ६ महिन्यानंतर माहित झालं. आता निवडणुकीदरम्यान योगी येथे आले होते. दोन दिवस थांबले. तो खूप गंभीर स्वभावाचा आहे. आम्ही देखील त्याला महाराज म्हणतो.'