नवी दिल्ली : फ्लोरिडामध्ये एका महिलेला वाघानं आपल्याजवळ खेचलं... आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला... परंतु, याचा परिणाम मात्र लगेचच या वाघाला भोगावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेनसाकोला इंटरस्टेट फेअर सुरू असताना ही घटना घडली. उल्लेखनीय म्हणजे, जेव्हा ही घटना घडली त्यावेळी या वाघाला पाहण्यासाठी आलेली अनेक लहानगे तिथं उपस्थित होते. 


दोन वर्षांच्या बंगाल टायगरनं पिंजऱ्यात उभ्या असलेल्या महिला ट्रेनरला आपल्या जबड्यानं पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे, ट्रेनर विसेन्टा पेजेस यांच्या पायाला गंभीर दुखापत झालीय. 


ही घटना क्रूर स्वरुप धारण करणार एवढ्यात तिथं दुसरा ट्रेनर दाखल झाला आणि त्यानं बंगाल टायगरला रॉडनं मारण्यास सुरुवात केली. 


ही घटना इथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलीय.